तुळजापूर विधानसभेच्या 410 मतदान केंद्रावर होणार लोकशाहीचा उत्सव साजरा

mhcitynews
0

205 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही व रेकॉर्डिंगची व्यवस्था

सिद्दीक पटेल / तुळजापूर 

241 तुळजापूर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या तयारी संदर्भात येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, नायब तहसीलदार संतोष पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार उपस्थित होते.


मतदारसंघातील माहिती देताना त्यांनी सांगितले की तुळजापूर मतदारसंघात एकूण 410 मतदान केंद्रावरमतदान पार पडणार असून, मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 3 लाख 80 हजार 669 आहे. यात पुरुष 2,00,218 स्त्री 1,80,444 इतर 7 आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या 3837 असून मतदार संघात 410 मतदान केंद्र आहेत. यासाठी 45 क्षेत्रीय अधिकारी व 2108 कर्मचाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 


मतदारसंघात संवेदनशील एक मतदार संघ शेकापूर असून पडदानशील केंद्र संख्या 22. दिव्यांग मतदान केंद्र 1. महिला मतदान केंद्र 1. आदर्श मतदान केंद्र 9 युवा मतदान केंद्र 1आहे. या काळात 12भरारी पदक. स्थिर सर्वेक्षण पथक 21. चित्रीकरण पथक 3 तसेच चित्रीकरण पडताळणी पथक 6 अशी नियुक्ती करण्यात आलेली आहे. एकूण 205 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही व रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी व निवडणूक आचारसंहितेचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top