तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर येथे साई माऊली चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर यांच्यावतीने मंगळवार दि. 15 रोजी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी चालत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना ( उबाठा ) सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
चंद्रकांत काळे अजय जाधव सुभाष घोणे यांच्या वतीने मागील 24 वर्षापासून ही परंपरा अविरत चालू आहे त्यांच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व या पुढील काळात देखील अशाच प्रकारे सदर ची परंपरा व सेवा सुरू राहावी यासाठी आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना केली.
याप्रसंगी माझ्यासमवेत चंद्रकांत काळे, कुमार इंगळे, अजय जाधव, प्रदीप घोणे, अमोल जाधव, संदीप साळुंखे, सागर इंगळे, कैलास काकडे, अर्जुन साळुंखे, नितीन जट्टे, विकी वाघमारे, मनोज देशमुख, मंगेश भुजबळ, आलोक शिंदे, नरेश मुर्तडक, मुन्ना पडवळ,बबलू राऊत आदींसह इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते..
