विधान परिषदेचे माजी सदस्य तथा तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते नरेंद्रजी बोरगांवकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रोडवरील मोतीझरा स्मशानभूमीत दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नरेंद्र बोरगांवकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत विविध महत्त्वाची पदे भूषविली. धाराशिव व लातूर जिल्हा एकत्र असताना धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिव या पदावर त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे आजही तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांना आदराचे स्थान आहे. या कार्यकुशल, मार्गदर्शक नेत्यास "सिटी न्यूज परिवाराच्या" वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
