महारोजगार मेळावा ; मुलाखतीनंतर थेट युवकांना नियुक्तीपत्र
तुळजापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्या वतीने आयोजित 'महारोजगार मेळावा' रविवार दि. 6 रोजी केवडकर मंगल कार्यालय, हॉटेल ब्रीज पार्क पाठीमागे तुळजापूर येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तुळजापुर शहराध्यक्ष अमर चोपदार यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजापुर शहर, तालुका व धाराशिव तालुक्यातील सुशिक्षित तरुणांनी या मेळाव्यासाठी हजेरी लावली होती .
मेळाव्यात विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी मुलाखतीसाठी उपस्थित होते. या महारोजगार मेळाव्यासाठी शेकडो बेरोजगार युवक, युवतींनी नोंदणी केली होती. अशा बेरोजगार युवकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेत शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना जागेवरच नियुक्तीपत्र देन्यात आले.
मागील काळात अनेक लोकोपयोगी उपक्रम आपण हाती घेतले व ते सक्षमपणे पार पाडले. विकासाचा दृष्टिकोन व समाजकारण हा आपल्या राजकारणाचा पाया आहे. आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना रोजगार मिळाल्याचे समाधान वाटते. मतदारसंघातील एकही तरुण बेरोजगार राहणार नाही, यासाठी काम करेल व कौशल्य विकास आधारित असंख्य व्यवसाय युवकांना करता येतील, तालुक्यातील आमदाराने रोजगार या मुख्य प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता तो आता सूटणार आहे. पात्रतेनुसार थेट नियुक्ती देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळाला आणि भविष्यातही मिळणार आहे. युवकांनी हताश न होता आपल्या पात्रतेनुसार व्यवसाय अथवा रोजगार निवडावा असे आवाहन देखील आयोजक अशोक जगदाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास नितीन कासार, नानासाहेब पाटील, आकाश मुंगळे, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
