तुळजापूर प्रतिनिधी
बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरत संतुलित जगण्याचा मंत्र देत सामान्य माणसाच्या हक्कांसाठी डिजिटल स्वरूपात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक माहिती बातमी स्वरूपात आपणांपर्यंत पोहोचवत आलो आहोत डिजिटल माध्यमासोबत प्रिंट ला हि तितकेच महत्व आज सोमवार दि. 7 रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या सुरु असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेला आपणा सर्वांच्या सहकार्याच्या बळावर सुरुवात केलेल्या सा. विकली गोल्ड वार्ताच्या वर्धापन विशेष अंक तुळजाभवानी देवी अर्पण करून देवी चरणी ठेवण्यात आला त्यानंतर मंदिरात सर्व मान्यवरांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल भाऊ रोचकरी, आम आदमी पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष मधुकरजी शेळके, दै. पुण्यनगरीचे श्रीकांत कदम, दै. तरुण भारत संवादचे पत्रकार सचिन ताकमोघे, दै. जनमतचे ज्ञानेश्वर गवळी, दै. संघर्ष चे संजय खुरुद, दै. लातूर समाचारचे संजय गायकवाड, दै. सामनाचे अनिल आगलावे, दै. एकमतचे सचिन ठेले, वीर महाराष्ट्र न्यूज चे जुबेर शेख, पुजारी अमोल ताकमोघे आदी उपस्थित होते.
