बिग फाईट | बारामती विधानसभेसाठी काका-पुतण्यात होणार लढत

mhcitynews
0

सिद्दीक पटेल 

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (एसपी) गटाची गुरुवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत राज्यातील सर्वांच्या लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर काका-पुतण्यामध्ये बिग फाईट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  


अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघावर अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार कोणता उमेदवारी देणार याचे सर्व जन उत्सुकतेने वाट पाहात होते अखेर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र हा अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचा मुलगा आहे. युगेंद्र शरद पवार गटातून निवडणूक लढवणार आहेत. येथे मोठी चूरशीची लढत पाहायला मिळेल. याआधी लोकसभा निवडणुकीतही बारामतीच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत झाली होती, त्यात सुळे विजयी झाल्या होत्या.


कोण आहे युगेंद्र पवार 

युगेंद्र पवार हे अजितपवार यांच्या धाकट्या भावाचे पुत्र असून ते शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. 32 वर्षीय युगेंद्र यांनी बारामतीतून निवडणूक लढवताना सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन येथून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलरची पदवी घेतली आहे. युगेंद्र यांना शरद पवार यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे. ते विद्या प्रतिष्ठानमध्ये खजिनदार म्हणूनही काम करतात. तिकीट मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार म्हणाले की, पक्षप्रमुख शरद पवार यांनी आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसेच मी पूर्ण निष्ठेने काम करणार असल्याचे युगेंद्र यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top