धाराशिव जिल्हा प्रमुखपदी सुरेश चौधरी यांची नियुक्ती

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित ओ.बी.सी. बारा बलुतेदार विभाग धाराशिव जिल्हा प्रमुखपदी सुरेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र राज्य ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद आणि शिवसेनेचे राज्य प्रवक्ते योगेश केदार यांच्या हस्ते सुरेश चौधरी यांना धाराशिव जिल्हा प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल असे नियुक्ती पत्रात म्हंटले आहे.


सुरेश चौधरी यांच्या नियुक्तीनंतर तुळजापूर नाभिक बांधवांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.श्री संत सेना महाराज नाभिक उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल बंटी कावरे,शहराध्यक्ष रंगनाथ कावरे,सचिव जयंत चौधरी,बाळासाहेब राऊत,आण्णासाहेब वाघमारे,पंडित मगर,उमेश दळवी,संतोष महाबोले, मुकुंद मगर,हभप प्रकाश महाराज गवळी,आशितोष राऊत,नागनाथ चौधरी,आप्पा आगलावे आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top