तुळजाभवनी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या वतीने अन्नदान

mhcitynews
0

मंगरूळ प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री महेंद्र काका धुरगुडे आणि सन अँड ओशन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या वतीने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्नदान करण्यात आले.


सध्या नवरात्र महोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला जात आहे. दूरवरून भाविक भक्त माता तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असतात. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे आणि सन अँड ओशन ग्रुप ऑफ कंपनीज मंगरूळ ता.तुळजापूर यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले. या अन्नदानाचा महिला, लहान मुले, वृद्ध, युवक, युवती आदी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला.


या प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्यासोबत सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, सन अँड ओशन कंपनी चे अधिकारी, कर्मचारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top