तुळजापूर प्रतिनिधी
खासदार ओमराजे यांच्या पत्नी सौ.संयोजनी निंबाळकर, शिवसेना महिला नेत्या सौ.शामलताई वडणे, डॉ.सौ.शुभांगी कुलदिप उर्फ धिरज पाटील ह्या
तुळजापूर विधानसभा परीसर पिंजुन काढत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड.कुलदिप धिरज आप्पासाहेब पाटलानां आमदारकी जिंकुन देणारच असा एकच संकल्प करत. गावोगावी आघाडी घेतली आहे.
प्रथम तुळजापूर शहरात डोअर टू डोअर प्रचार करून घरोघरी हळदी कुंकू कार्यक्रमाद्वारे प्रत्येक महीलेला अँड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब पाटलानांच मतदान करून हाताचा पंजा या एक नंबरवरील खुणे समोरील बटन दाबुन प्रचंड मतानी विजयी करा असे आश्वासन घेतले. तसेच संपुर्ण विधानसभा क्षेत्रात नळदुर्ग, तामलवाडी, सिंदफळ, काटी, सावरगाव, मसला, बारूळ, होर्टी, चिकुद्रा, मंगरूळ, सुरतगाव, खडकी, खानापूर, शिवाजीनगर तांडा, पिंपळा खुर्द, लोहगाव, बोरगाव, सलगरा, बोळेगाव, कुन्सावळी, सिंदगाव, हंगरगा नळ, मानेवाडी, जळकोटवाडी, टाकळी, केशेगाव, शिंदेवाडी सह सर्व ७२ गावात गल्लोगल्ली फिरून अँड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब कदम पाटलानांच विजयी करा असा जोरात प्रचार चालू आहे.
धिरज भैय्या पाटील आमदार झाल्या झाल्या स्वतंत्र महीलाच्या विविध समस्या विषयी कार्यालयाची स्थापन करून तेथे प्रत्येक महीलांच्या समश्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू तसेच प्रत्येक गावात महीला सभागृह बांधून देऊ,ब चत गटानां प्रोत्साहन देऊ, महीलांचे आरोग्य सामाजिक असे विविध समस्या सोडवून महीलानां उद्योग धंदे निर्माण करू असे आश्वासन डॉ. सौ.शुभांगी कुलदिप उर्फ धिरज कदम पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या.
यावेळी शोभाताई शिंदे, सुरेखाताई मुळे ,वनिता पाटील, हर्षदा पाटील , अंजली कुतवळ ,नीलम पाटील, दिपाली पाटील, गायत्री भोसले,उर्मिला जाधव, श्रद्धा पाटील ,सोनाली पाटील, रेवती पाटील, तनुजा पाटील, दीक्षा पाटील, तृप्ती पाटील, करुणा पाटील, प्रिया पाटील, वैशाली पाटील , बालिका माळी ईत्यादी महीला कार्यकर्त्यां परीश्रम घेत आहेत.
