तुळजापूर प्रतिनिधी
महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अँड.कुलदिप धिरज आप्पासाहेब कदम पाटील यांनी तुळजापूर शहरात भव्य पदयात्रा, रँली काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून, दिपक चौक भवानी रोड, खटकाळ गल्ली, राजा कंपनी, भोसले गल्ली, मातंग नगर जिजामाता नगर, हडको, आर्य चौक, कमान वेस, मुलान गल्ली, जवाहर गल्ली, वेताळ नगर, वासुदेव गल्ली सह गोलाई करून अँड. कुलदिप धिरज आप्पासाहेब कदम पाटील यांच्या संपर्क कार्यालया येथे सांगता झाली. यावेळी तुळजापूर शहरात महाविकास आघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहू संख्येने सहभागी झाले होते.
