तुळजापूर प्रतिनिधी
येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्था स्थेच्या तुळजापूर शाखेत संस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या वतीने यावेळी ज्येष्ठ समाजसेवक विलास वेदपाठक, प्रसिद्ध उद्योजक किरण चव्हाण, प्रदीप काशीद, पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष सचिन ताकमोघे, युवा पत्रकार सिद्दीक पटेल, शंतनु वाघ, एडवोकेट सुधीर पठाडे, दादासाहेब हंगरगेकर या उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. अल्पावधीतच दिशा पतसंस्थेच्या तुळजापूर शाखेने बँकिंग क्षेत्रात मोठे नाव कमावले असून ग्राहकांना तत्पर सेवा देण्यामध्ये सध्या ही बँक अग्रेसर झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जात आहेत.
वार्षिक 500 कोटींची उलाढाल करत सभासदांना दरवर्षी लाभांस तर ठेवीदारांच्या ठेवीला आकर्षक व्याज देत आहे त्यामुळे अल्पावधीतच ही संस्था तुळजापूर शहरात लोकप्रिय झाली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिशा नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी दीपक देशमुख यांनी परिश्रम घेतले.
