रेकॉर्डवरील गुन्हेगारांने भर दिवसा 50 हजार रुपये चोरून नेले

mhcitynews
0

फिर्यादी राहुल कोळी यांची पोलीस स्टेशन येथे तक्रार तक्रारीवरून गुन्हा दाखल


तुळजापूर प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील पापनास तीर्थ येथे विजया किराणा स्टोअर्स असून या किराणा दुकानांमधील संधीचा फायदा साधत वर्षाचे दुकान भाडे देण्यासाठी आणलेले तब्बल 50 हजार रुपये लांब पास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एका युवकावर दिनांक 10 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील पापनास तीर्थ येथे फिर्यादी यांचे विजय किराणा स्टोअर्स असून दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या दोन नंबरच्या गल्ल्यांमध्ये एका वर्षाचे दुकान भाडे देण्यासाठी ठेवलेली पाचशे रुपये दराच्या 100 नोटा असे एकूण 50 हजार रुपये सदर गल्ल्यांमध्ये ठेवले होते .फिर्यादी काही कारणास्तव बाहेर गेले असता संधीचा फायदा साधत गल्ल्यामधील ठेवलेले 50 हजार रुपये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गल्लीमधील युवकाने चोरून नेले .अशा प्रकारची फिर्याद राहुल कोळी यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून पापणास तीर्थ येथील मिलिंद फुलचंद शिरसाट राहणार पापनास तीर्थ यांच्या विरोधात भारतीय न्याय संवर्धन कलम 303(२)अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चोपदार करत आहेत .आरोपी हा फरार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे .


सदर आरोपी हा रेकॉर्डवर ला आरोपी असून यापूर्वी याच आरोपीने भर रस्त्यामध्ये दुपारी एका पिग्मी एजंटला मारहाण करून लुटल्याची घटना पापणास तीर्थ भागात घडली होती .यावर आरोपी हा न्यायालयीन जामीनवर सोडण्यात आला होता .गल्ल्यामधील 50 हजार रुपये चोरून नेल्याची दुसरी घटना असून पोलिसांसमोर आरोपीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान असणार आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top