तुळजापूर प्रतिनिधी
माजी मंत्री तथा तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील व विनोद पिंटू भैया गंगणे भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांच्या सूचनेनुसार येथील भाजपचे कार्यकर्ते धैर्यशील दरेकर यांना भाजप शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक सचिन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, संदीप गंगणे, विक्रम देशमुख, प्रभाकर मुळे, प्रतीक रोचकरी,अविनाश गंगणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राम चोपदार, दिनेश बागल, महादेव रोचकरी, समर्थ पैलवान, नितीन पवार, प्रमोद दाणे आदींसह भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
