तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर ते निलेगाव मार्गे जाणारी एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी दिंडेगाव / टेलरनगर ग्रामपंचायतने तुळजापूर आगार व्यवस्थापकडे पत्राद्वारे केली आहे.
आरळी काळेगाव दिंडेगाव मार्गे शालेय विध्यार्थ्यांना वाहतुकीचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व स्थानिक नागरिकांना जाण्या-येण्याची गैरसोय होत आहे. सदर एस.टी सेवा सुरु व्हावी. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे सहज शक्य होईल.
सदर एस.टी. सेवा बंद असून. या मार्गावर बससेवा नसल्यामुळे या भागातील प्रवाशांना खासगी वाहनाने शहर गाठावे लागत असल्याचे यातून प्रवासी विद्यार्थी व नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बंद असलेली एसटी बस सेवा पूर्वत चालू करावी अशी मागणी दिंडेगाव /टेलरनगर गावच्या सरपंच रियाज अफसर सय्यद यांनी केली आहे.
