तुळजापूर प्रतिनिधी
राष्ट्रपती पुरस्कार विजेते ,ज्येष्ठ समाज सुधारक व प्रसिद्ध व्याख्याते आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हे सहपरिवार तुळजापूर येथे देवी दर्शनाकरिता आले असता तुळजापूर खुर्द येथील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट देऊन तुळजाई पतसंस्था व तुळजाई सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध समाज उपयोगी उपक्रमांची माहिती घेतली.
यावेळी मार्गदर्शनपर बोलत असताना ते म्हणाले की भ्रष्टाचार ही समाजास लागलेली उभी कीड असून यामुळे संपूर्ण समाज व्यवस्था संकटात आली आहे आज प्रत्येक जण केवल पैशाच्या पाठीमागे धावत असून समाजासाठी ,लोक हिताकरिता झटणारी माणसे दिवसा गणित कमी होत आहेत तुळजाई पतसंस्था व तुळजाई सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध सामाजिक उपक्रम स्तुत्य असून येथील नगर परिषद शाळा राज्यातीलच नव्हे तर देशातील सरकारी शाळांना आदर्श अशी आहे लोक कल्याणाकरिता सुरू असलेल्या या चळवळीत तुळजाई परिवाराचे कार्य प्रेरणादायक आहे गाव व शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले.
नुकताच श्री भास्करराव पेरे पाटील यांचा शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली यांच्यावतीने दिला जाणारा कर्मयोगी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला असून यानिमित्त तुळजाई परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर तुळजापूरच्या नायब तहसीलदार पेरे मॅडम, तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बाबुराव देशमाने व्हाईस चेअरमन खंडू ताटे सर, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे ,संचालक संजय देशमाने, मकसूद भाई शेख ,व्यवस्थापक संजय ढवळे साहेब, दुर्वास भोजने ,न प शाळा शिक्षक वृंद तुळजापूर खुर्द ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
