प्रयोग आणि कर्तृत्व एकत्र आणने हेच नविन शैक्षणिक धोरणाचे ध्येय आहे - डॉ . सुयोग अमृतराव

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे दि.१२ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत विवेकानंद सप्ताह आयोजित करण्यात आला होता,या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी डॉ.सुयोग अमृतराव, व्यवस्थापन शास्त्र, विभाग प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उप परिसर धाराशिव यांनी वरील प्रतिपादन केले,पुढे ते म्हणाले की, आपल्या समाजात आज वाईट गोष्टी या भूषणावह ठरत आहेत,पुस्तकाच्या ज्ञाना शक्ती पेक्षा मनगटाच्या शक्तीला आज महत्व प्राप्त होत आहे,या गोष्टींमुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते.


स्वामी विवेकानंद यांच्या संदेशानुसार देशातील तरुण देशाला तारु शकतात,पण आज देशातील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असेच चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे, सकारात्मक विचारधारेने सामाजिक व्यवस्थापन उत्तम होऊ शकते.सुरक्षीत नसलेल्या उद्योजकते साठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे प्रयोगशिल कार्य करण्याचे मोठे आव्हान आज शिक्षकांसमोर आहे, ठरवुन एखादा मार्ग स्वीकारला तर अडचणी दुर होतील,पण यासाठी मानसिकता घट्ट झाली पाहिजे, अभ्यासातील मुळ संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे, वैश्विक ज्ञानामध्ये समांतरता आहे,आज शिक्षक हा मुळ संकल्पना स्पष्ट करणारा शेवटचा पर्याय ठरत आहे, विद्यार्थ्यांना गुंतवुन ठेवणे गरजेचे आहे,शिक्षक किंवा विद्यार्थी हा क्रिया करणारा जरी असला तरी तिसरा व्यक्ती पहाणारा असतो,त्याचा निर्णय देखील महत्वाचा असतो,कारण तिसऱ्या व्यक्तिचे लक्ष आपल्याकडे असते हे आपणांस विसरता येणार नाही,उत्तरांच्या प्रयोगशाळेपेक्षा आज प्रश्नांची प्रयोगशाळा निर्माण होणे काळाची गरज आहे,कारण यातुनच समाजाची नवनिर्मिती होऊ शकते , माणसांच्या मनाचे व्यवस्थापन करण्यासाठी माणसाला लिहितं,बोलतं करणं आज अंत्यंत गरजेचे आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्र‌‌‌ .प्राचार्य डॉ. जीवन पवार म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी एकटा माणूस कांहीच करू शकणार नाही, त्यासाठी समाजाचीही साथ असणे आवश्यक आहे,हीच साथ मिळवण्यासाठी तुळजाभवानी महाविद्यालयात आम्ही तुळजापूरकर शिक्षणासाठी एक पाऊल पुढे ही संकल्पना राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये समाजाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे,या अभियानामुळे ग्रामीण भागात देखील शिक्षणविषयक सकारात्मक संदेश जाईल,केवळ शिक्षण घेऊन ही प्रक्रिया थांबत नाही तर याचबरोबर शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी दिलेले संस्कारांचे धडे देखील समाजात रुजविण्याचे पवित्र कार्य संपन्न होईल,कारण आज आत्मप्रौढी मिरवणाऱ्या पिढीपेक्षा शिक्षणाने संस्कारित झालेली पिढी निर्माण होणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


यावेळी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा .धनंजय लोंढे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ .मंत्री आर. आडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जे.बी.क्षीरसागर यांनी केले तर आभार डॉ दयानंद हाके यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top