सिटी न्यूज वार्ता / तुळजापूर
मकरसंक्रांती म्हंटले की, महिलांचा जिव्हाळ्याचा विषय येतो. संक्रांतीनिमित्त महिला आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवत वाण म्हणून एकमेकींना भेटवस्तू देतात. तुळजापूर येथील अमृतराव परिवाराच्या वतीने सौ. सरोजा नरेश अमृतराव यांच्या वतीने पारंपारिक पद्धतीमध्ये थोडा बदल करत सर्व महिला एकत्र येत सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रमाची घेण्याची सुरवात केली.
सलग चौथ्या वर्षी सौ. सरोजा नरेश अमृतराव व अमृतराव परिवारातर्फे आयोजित हळदी-कुंकू समारंभ व लकी ड्रॉ कार्यक्रम बुधवार दि. 22 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील आणि सौ. अर्चनाताई विनोद गंगणे यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यामुळे समारंभाची शोभा वाढली.
कार्यक्रमात संपूर्ण वेताळ नगर, काळभैरव कडा, आराधवाडी, खडकाळ गल्ली, भिमनगर, सिद्धार्थ नगर, मातंग नगर आणि तुळजापूर भागातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिलांचा हा भरघोस प्रतिसाद हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे प्रतीक ठरला.
लकी ड्रॉमुळे महिलांमध्ये विशेष आनंद आणि उत्सुकता दिसून आली. अशा उपक्रमांमुळे समाजातील बंधुभाव वाढतो आणि परंपरांचा सन्मान टिकून राहतो. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या समारंभात परंपरांचे जतन करत, अमृतराव परिवाराच्या एकमेकांप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र चर्चा होत आहे !
