रक्तदान हे श्रेष्ठ दान ; दिनेश (अण्णा) क्षीरसागर

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानीजधाम यांच्या संकल्पनेतून भारतीय जवान व सर्व सामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये शनिवार 4 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या निमित्त तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन युवा नेते भावी नगरसेवक श्री दिनेश (अण्णा) क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप शहर सरचिटणीस श्री धैर्यशील दरेकर यांची प्रमुख उपस्थित होते.  


एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणे आवश्यक आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो, पण इतरांसाठी जगणे ही मोठी गोष्ट आहे. रक्तदान करून लोकांना मदत करता येते. रक्तदान हे महान दान आहे, ते जीवनदान करण्यासारखे मानले जाते. रक्तदान केल्याने समोरच्या व्यक्तीचा जीव तर वाचतोच, पण रक्तदात्याला निरोगी होण्यासही मदत होते, त्यामुळे ते दोघांसाठीही फायदेशीर आहे. असे मत दिनेश अण्णा क्षीरसागर यांनी स्वतः रक्तदान करीत मत व्यक्त केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी, नागरिक,उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top