धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री होणे भाग्याचेच : राधाकृष्ण विखे पाटील

mhcitynews
0

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन 

तुळजापूर प्रतिनिधी 

धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री होणे भाग्याचेच माझ्यावर जी जबाबदारी देतील ते मी स्वीकारेल, श्री आई तुळजाभवानी माता ती सदैव आमच्या पाठीशी आहे आज देवीच्याच आशीर्वादाने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस राज्यातील सर्व जनतेच्या आशा पूर्ण करतील. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवार दिनांक 3 रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास आले असता देवी दर्शन केल्यानंतर त्यांनी पत्रकारास संवाद साधताना ते बोलत होते. 


प्रथम त्यांनी देवीची नित्य पूजा करून दर्शन घेतले त्यानंतर मंदिर संस्थांच्या वतीने मंदिर संस्थेचे व्यवस्थापक माया माने यांनी त्यांच्या देवीचा प्रतिमा देऊन सत्कार केला.तसेच धाराशिव जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संताजी चालूक्य पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार केला यावेळेस माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे,आनंद कंदले,शहराध्यक्ष शांताराम पेंदे, अस्मिता कांबळे सोलापूरचे शहाजी पवार, विकास मलबा, संदीप गंगणे, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमर राजे परमेश्वर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश चोपदार, प्रसाद पानपुडे, ओबीसी सेलचे शिंगाडे इत्यादी उपस्थित होते.



मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील येणारे कृष्णा खोऱ्याचे पाणी याबाबत मी पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेईल लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल असे मी ग्वाही देतो तसेच लाडकी बहीण योजना याबाबत काही निष्कर्ष व अटी नाहीत ही केवळ एक अफवा आहे डिसेंबर चा लाडके बहिणीला हप्ता मिळाला असून तसेच हप्ते चालू राहतील. राज्यातील विकास निधी पैसा यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कुठलाही अडथळा येणार नाही. 


यावेळेस आपण धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यास इच्छुक आहेत का असा प्रश्न केला असता यावेळेस पाटील म्हणाले की हा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांचा असून ते जी माझ्यावर जबाबदारी देतील त्याला मी स्वीकारेल कारण धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री होणे भाग्याचेच आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकटेच पदभार पाहत आहेत हा त्यांचा गैरसमज आहे आता त्यांना जनतेने घरी बसवले त्यांनी घरीच बसाव.

बीड जिल्ह्यामध्ये जातीचा राजकारण होत असून मराठा विरुद्ध वंजारी याबाबत आपले मत काय मला असे वाटते की जातीचे समीकरण व राजकीय समीकरण ही वेगळे असून जो गुन्हेगार आहे त्याची जात न पाहता त्याला कायदेशीर शिक्षा होणे गरजेचे आहे यामुळे येथे जातीचा प्रश्न निर्माण होत नाही.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top