तुळजापूर प्रतिनिधी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजीटल लिटरसी हे विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे कामठा,ता तुळजापूर जि धाराशिव येथे सुरू असुन शिबिराच्या ब्रिद वाक्यावर आधारित व्याख्यानात प्रा. सोनाली आनंद मुळे, संचालिका अष्टभूजा कॉम्प्युस्किल्स तुळजापूर यांनी वरील प्रतिपादन केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,आज सर्वांना मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट जरी येत असले तरी,याचा अर्थ असा होत नाही की, आपणांस त्याबद्दल पूर्ण माहिती आहे, डिजीटल साक्षरता ही नविन संकल्पना आहे, याचा अर्थ ऑनलाईन अभ्यास, किंवा इतर माहिती घेत असताना तितकीच सतर्कता बाळगणे देखील आवश्यक आहे. ज्या प्रमाणे आपण पाहिजे ती माहिती किंवा करमणूक म्हणून जरी सोशल नेटवर्किंग करत असलो तरी एक तिसरा व्यक्ती आपल्याला पहात असतो,त्याला हॅकर म्हणतात, हे लोक अगदी सहजपणे कोणाचीही माहिती वेगवेगळ्या अकाउंट वरुन काढून त्याचा दुरुपयोग करु शकतात.
प्रत्येक सॉफ्टवेअर हे एक डिजिट प्रमाणे असते त्याचे वेगवेगळे कोड असतात, सामान्य लोकांना याबाबत माहिती नसते. हा डिजीटल साक्षरतेचा भाग आहे,ज्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.सदर प्रसंगी डॉ. आनंद मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मंत्री आर आडे यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. व्ही. एच. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. बी. जे कुकडे यांनी मानले. यावेळी सर्व स्वयंसेवक व तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समापन डॉ. बापूराव पवार यांनी केले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.
