धाराशीवचे पालक सचिव अंशु सिन्हा यांची तुळजापूर भेट

mhcitynews
0

दर्शनानंतर घेतली मंदिर विकास आराखड्याबाबत माहिती


तुळजापूर प्रतिनिधी 

धाराशिव जिल्ह्याच्या पालक सचिव अंशु सिन्हा, सचिव, वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांचा पूर्वनियोजित धाराशिव दौरा पार पडला.

सदर दौऱ्यादरम्यान त्यांनी तुळजापूरला भेट देऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात बैठक घेऊन मंदिर संस्थानमध्ये चालू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेतली. सोबतच प्रस्तावित विकास आराखड्याबाबतही माहिती त्यांनी यावेळी पीपीटी आणि व्हिडिओ सादरीकरणाद्वारे घेतली.

यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, शुभम वायकोस, ऋषिकेष पराडे, अर्जुन आमले इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top