तुळजापूर प्रतिनिधी
पञकार दिनाचे औचित्य साधून आज लोकमंगल मल्टिस्टेट को. ऑप सोसायटी लि.,सोलापूर शाखा : तामलवाडी येथे "पत्रकार दिन" साजरा करण्यात आला. यावेळी तामलवाडी व परिसरातील पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलेले व करत असलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिक तरुण भारतचे पत्रकार श्री. अविनाश गायकवाड साहेब व महाराष्ट्राचा मानबिंदू असलेले ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रिय दैनिक लोकमतचे पत्रकार श्री. संतोष मगर साहेब यांचा तामलवाडी शाखेतर्फे यथोचित मानसन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस स्टेशन चे सेकंड API श्री.लोंढे साहेब,पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. काझी साहेब, गावातील ज्येष्ठ डॉ.वाले सर,पिंपळा येथील प्रगतशील बागायतदार श्री. रोकडे सीताराम,शाखेचे नियमित कर्जदार श्री.लोंढे शत्रुघन व शाखेचे शाखाधिकारी श्री.सिद्दीकी फजल,कॅशियर श्री. म्हेत्रे राम व क्लार्क श्री कुंभार शिवाजी हे उपस्थित होते यावेळी लोकमंगल मल्टीस्टेटच्या विविध ठेव योजनांची माहिती व लोकमंगल फौंडेशन मार्फत होत असलेल्या अनेक समाजोपयोगी कामांची माहिती देण्यात आली.
