तुळजाई नागरी पतसंस्था येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार

mhcitynews
0

सिटी न्यूज प्रतिनिधी 

सहा जानेवारी पञकार दिनाचे औचित्य साधून शहरातील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुळजापूर खुर्द येथे "पत्रकार दिन" साजरा करण्यात आला. यावेळी तुळजापूर शहर व परिसरातील पत्रकारिता क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील विविध लोकप्रिय दैनिकात उत्कृष्ट काम करत असलेल्या पत्रकारांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. यावेळी शहरातील इतिहास तज्ञ प्रा. सतीश कदम यांनी उपस्तित पत्रकार बांधवांना संबोधित केले.


यावेळी माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, संस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, व्हॉइस चेअरमन ताटे सर, संचालक मकसूद शेख, ज्येष्ठ पत्रकार पोपळे आप्पा, इतिहास तज्ञ प्राध्यापक सतीश कदम आधी व्यासपीठावर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top