छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुळजापूर येथे भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम – १० सिमेंट बाकड्यांचे लोकार्पण

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पवित्र निमित्ताने रणसम्राट कबड्डी संघाचे अध्यक्ष श्री. शुभम क्षीरसागर यांच्या पुढाकाराने आणि विनोद पिटू भैय्या गंगणे व विशाल भाऊ रोचकरी यांच्या संकल्पनेतून तुळजापूर मंदिर परिसरात भाविकांसाठी १० सिमेंट बाकड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.


भाविक भक्तांच्या सेवेसाठी हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला असून, या समाजोपयोगी कार्याचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष मा. बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वेळी ता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन श्री. शिवाजी बोधले, शहर अध्यक्ष शांताराम पेंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगणे, शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर, युवा नेते दिनेश आण्णा क्षीरसागर, शुभम क्षीरसागर, अर्जुन आप्पा साळुंके, दिनेश आप्पा कापसे, ओम दरेकर, विराज कोतिंबिरे, जयसिंग क्षीरसागर, अर्जुन आप्पा साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.


भाविकांसाठी मोठा दिलासा – कौतुकाचा वर्षाव

तुळजापूर येथे देशभरातून लाखो भक्तगण दर्शनासाठी येतात. मात्र, बसण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने अनेक भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर रणसम्राट कबड्डी संघाच्या या समाजहितैषी उपक्रमामुळे भाविकांना दिलासा मिळणार असून, मंदिर परिसरातील या सोयीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.


शुभम क्षीरसागर यांची सामाजिक बांधिलकी ठळक

या लोकोपयोगी उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व भाविक भक्तांनी भरभरून कौतुक करत शुभम क्षीरसागर यांच्या सामाजिक जाणिवेची स्तुती केली.


"सेवा हीच खरी ईश्वरभक्ती" या तत्त्वावर आधारित हा उपक्रम भविष्यातही अशाच समाजोपयोगी कार्याची प्रेरणा देईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top