धाराशिव रेल्वेस्थानक होणार तिप्पट मोठे, सुधारित रेल्वेमार्गासाठी ३००० कोटींची तरतूद

mhcitynews
0

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली निधीच्या मंजुरीची मागणी

सिटी न्यूज वार्ता 

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या सुधारित प्रकल्पाची किंमत आता तब्बल ३००० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला ९०४.९२ कोटींची मंजुरी मिळाली होती. मात्र, ठाकरे सरकारच्या काळात राज्य हिस्सा न दिल्याने काम अडीच वर्ष रखडले आणि प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ११७.४९% वाढ झाली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून वाढीव निधी लवकर देण्याची मागणी केली आहे.


प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा

धाराशिव रेल्वेस्थानकाची इमारत आधीच्या ४००० चौरस मीटरवरून १२,६३० चौरस मीटरवर वाढवण्यात येणार आहे. सर्व्हिस इमारतींना देखील पूर्वीच्या ११,४०० चौरस मीटर ऐवजी १७,६०० चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे.


  • मुख्य सुधारणा

लूप लाईन: जलदगती रेल्वेसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध.


रस्त्याखालून पूल: पूर्वी २० पुलांची योजना होती, आता ३१ पूल उभारले जाणार.


राष्ट्रीय महामार्गावरील पूल: ३८५ मीटरवरून ३९९ मीटर लांबीचा केला जाणार.


प्लॅटफॉर्म आणि पथमार्ग: प्रवाशांसाठी नवीन सुविधा.


पाणी साठवण टाक्या: जमिनीखालील आणि जमिनीवरील मोठ्या टाक्या उभारल्या जाणार.


रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवास: ३४२ निवासस्थानांऐवजी आता ३७३ निवासस्थानांची व्यवस्था.




  • ३००० कोटींचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील सरकार


२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, ठाकरे सरकारने राज्य हिस्सा दिला नाही, त्यामुळे प्रकल्प रखडला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर प्रकल्पाला गती मिळाली.


ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे अडीच वर्ष प्रकल्प ठप्प


वाढलेल्या कामांसाठी १००० कोटींचे अतिरिक्त भूसंपादन


फडणवीस सरकारने ५०% राज्य हिस्सा तत्काळ मंजूर केला


तुळजाभवानी तीर्थक्षेत्राला रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर स्थान


हा प्रकल्प पूर्ण झाल्यास धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूर यांना मोठा फायदा होणार असून प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित आहे.


  • फडणवीस यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र – निधी लवकर देण्याची मागणी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी २० जानेवारी रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी वाढीव प्रकल्प खर्चाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारने तातडीने निधी द्यावा, तसेच  

तुळजाभवानीच्या चरणी समर्पित हा रेल्वेमार्ग लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी खात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्याची माहिती आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top