श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचे कुलभूषण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित विद्यालयाचे सन्माननीय कमांडंट कर्नल मकरंदजी देशमुख सर, विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्रीमान घोडके सर, पर्यवेक्षक डॉ पेटकर सर व वर्गशिक्षक डॉ विजय वडवराव सर उपस्थित होते. सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


इयत्ता दहावीचा संग्राम जाधव या विद्यार्थ्याने सुंदर अंगावर शहारे येणाऱ्या अशा स्वरात शिवगर्जना सादर केली ! व शिवगर्जनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली .याप्रसंगी कुणाल नरवडे ,मंजुनाथ स्वामी, शेख वाहिद ,शेख आयाज, अर्णव रूपदास, चिन्मय गोसावी या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. याप्रसंगी श्री सलगर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर, चरित्रावर प्रकाश टाकला. श्री सूत्रावे सर यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे रोमांचक शब्दांमध्ये वर्णन केले. 


डॉ विजय वडवराव सर यांनी आजचे प्रमुख व्याख्याते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक कार्य, त्यांचे व्यवस्थापन ,गड किल्ल्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, महाराजांनी जोपासलेले वन, जंगल तसेच त्यांनी जलदुर्ग तेथील व्यवस्था, जहाजांची बांधणी, महाराजांचे शेतकरी महिला तसेच मावळे यांच्या बद्दल जिव्हाळा व प्रेम याविषयी माहिती दिली .विद्यालयाचे कमांडंट सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कडक शिस्त, स्वयंशिस्त ,लीडरशिप, धैर्य, धाडसीपणा त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवले. जिद्द ,चिकाटी मेहनत, परिश्रम व महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना याबद्दल विशेष माहिती दिली .

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या 26 जानेवारी चित्रकला स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले व त्यांचा गौरव करण्यात आला. बाल प्रमुख पाहुणे सावंत तर बाल अध्यक्ष समर्थ लगडे यांनी आपली भूमिका पार पाडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे या विद्यार्थ्यांनी केले तर शेवटी अविष्कार मते या विद्यार्थ्यांनी आभार प्रदर्शन केले सदरील कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top