माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कॉल आला होता.

mhcitynews
0


पुण्यातून मोठी बातमी समोर आली असून राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कॉल आल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी दुपारी सावंत यांच्या मुलाला ड्रायव्हरने पुणे विमानतळावर सोडले होते. त्यानंतर त्या ठिकाणाहून मुलगा गायब झाल्याची माहिती आहे. माजी आरोग्य मंत्री विमानतळावर दाखल झाले आहेत. ऋतुराज सावंत असे तानाजी सावंत यांच्या मुलाचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार तो सुखरूप असल्याचं म्हटलं जात आहे.


कौटुंबिक वादातून बँकॉकला गेल्याची माहिती 

दरम्यान पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारी सव्वाचार वाजता घरातून निघून गेला होता. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पुणे विमानतळावरू तो चार्टर फ्लाईटने बँकॉकला गेल्याची माहिती आहे. या प्रकरणात तानाजी सावंत यांनी त्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली गेली होती. पण प्राथमिक माहितीनुसार ऋषीराज सावंत याचे घरात वाद झाले होते, त्यानंतर तो बँकॉकला गेल्याचं समजतंय. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top