तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर येथून शक्तीपीठ ते भक्तीपीठ पायी दिंडीचे मंगलमय प्रस्थान मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या वेळी दिंडीतील पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात वारकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने या पवित्र यात्रेला सुरुवात केली.
यात्रेदरम्यान, आनंद (दादा) कंदले मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून टोपींचे वाटप करण्यात आले. युवा नेते विनोद (पिटूभैय्या) गंगणे यांच्या हस्ते हे टोपी वितरण करण्यात आले. यामुळे वारकऱ्यांमध्ये विशेष आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
या वेळी विजय (आबा) कंदले, सज्जनराव मेंबर साळुंके, नरेश काका अमृतराव, सतीश महाराज बांडे, अनंत माऊली सावंत, प्रभाकर नाईकवाडी, सुरेश महाराज डेरके, महादेव पौळ, सर्जेराव निकम, दत्ता हंगरगेकर तसेच बारालिंग भजनी मंडळाचे सर्व सदस्य आणि असंख्य वारकरी उपस्थित होते.
ही पायी दिंडी भक्तीचा, समर्पणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत जागर ठरली.
