तुळजाभवानी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती उत्साहात साजरी

mhcitynews
0


तुळजापूर / प्रा. चव्हाण सर 

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त तुळजाभवानी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जीवन पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नैतिक व वैचारिक अधिष्ठान निर्माण केले. आजच्या तरुणाईने त्यांच्या विचारांचा अभ्यास करून समाजासाठी कार्य करण्याची गरज आहे. राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्यापूर्वी तरुणांनी चव्हाण यांच्या साहित्याचा अभ्यास करून समाजहिताच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंत्री आर. आडे यांनी केले, तर आभार प्रा. बालाजी कह्राडे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top