डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुळजापूरमध्ये भव्य रक्तदान शिबीर – 107 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या विचाराने प्रेरित होत तुळजापूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल 107 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेबांना अनोखी मानवंदना अर्पण केली.


या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांनी केले होते. प्रत्येक रक्तदात्याचे भारतीय संविधान व प्रास्ताविका भेट देऊन, पारंपरिक फेटा बांधून, आणि अल्पोपाहार देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. या उपक्रमातून केवळ रक्तदान नव्हे, तर संविधानिक मूल्यांचीही जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला.


शिबिरस्थळी येणाऱ्या भीम सैनिकांसाठी थंड पाण्याची पाणपोई उभारण्यात आली होती, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला दिलासा मिळाला. या उपक्रमाला आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी भेट देऊन आयोजकांचे व रक्तदात्यांचे विशेष कौतुक केले.



या शिबिराची सुरुवात विधिज्ञ संघाचे तुळजापूर अध्यक्ष दत्तात्रय घोडके यांच्या प्रेरणादायी रक्तदानाने झाली. त्यानंतर शहर व तालुक्यातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी पुढे येत सामाजिक ऐक्याचे व मानवतेचे दर्शन घडवले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कीरण कदम, स्वप्निल शितोळे, चेतन कदम, आप्पा कदम, बंडू कांबळे, अक्षय कदम, सोनू कदम, अनुज कदम, गोकुळ कदम, विश्वास कांबळे, दादा सरकार, आण्णा पांडागळे, राहुल सोनवणे, कमलेश कदम, नागेश कदम, अनिकेत सोनवणे, अमित कदम, दीपक सोनवणे, ओम भालेकर, अजय कांबळे, औदू सोनवणे, लक्ष्मण कदम, कुणाल रोंगे, रोहित कदम, अजित सोनवणे, सुधीर सोनवणे, सुहास कदम, आदित्य कदम, दत्ता राऊत आदी कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.


या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि सामाजिक एकतेचा संदेश समाजात प्रभावीपणे रुजवण्यात यश आले.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top