तुळजापूर / सिद्दीक पटेल
तुळजापूर तालुक्यातील 108 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. यामुळे गावागावातील नेतृत्वाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच रंगतदार होणार आहे.
सोडत कार्यक्रम तहसील कार्यालयात प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडला. यावेळी स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण प्रक्रियेत अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व सर्वसामान्य प्रवर्गासाठी समतोल राखण्यात आला आहे. विशेषतः महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागातील महिला नेतृत्वाला नवसंजीवनी मिळणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर ही सोडत अत्यंत निर्णायक ठरणार असून प्रत्येक गावात संभाव्य उमेदवारांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या आरक्षणामुळे काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसमावेशक प्रतिनिधित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने ही आरक्षण प्रक्रिया एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे.
तुळजापूर तालुक्यातील 108 गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे पहा 👇🏻