तुळजापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हरिनाम संकीर्तन काढण्यात आले . श्री डुल्या मारुती पासून सकाळी ७:०० वा . हरिनाम संकीर्तनास सुरुवात होऊन आर्य चौक, भवानी मंदीर, खडकाळ गल्ली, पावणारा गणपती मार्गे श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदीर, जिजामाता नगर येथे सांगता करण्यात आली . यासाठी इस्कॉन धाराशीवचे भक्त आवर्जुन उपस्थित असतात . कलियुगात भगवंत प्राप्तीसाठी हरिनामाशिवाय अन्य पर्याय नाही म्हणून ' हरिनाम घडावे ' या उद्देशाने असे हरिनाम संकीर्तन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी काढण्यात येते .