तुळजापूर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस सबंध देशभर विविध सामाजिक उपक्रम आणि शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी साजरा करण्यात आला. तुळजापुरात शहर भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड वितरण करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
तुळजापूर तालुक्याला सलग दुसऱ्या टर्म मध्ये धाराशिव जिल्ह्याचे नेते आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे नेतृत्व मिळाले आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर तुळजापूर शहरांमध्ये भारतीय जनता पार्टी शहर शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिराला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
तुळजापूर शहरात
भारतीय जनता पार्टीच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोध्या नगर आणि विश्वास नगर येथील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे ऑनलाइन मोफत वाटप करण्यात आले. या शिबिरात एकूण ९० लाभार्थ्यांचे ई केवायसी चेक केले यापैकी एकूण ५४ इ केवायसी करण्यात आल्या. आरोग्यमित्र बाबासाहेब भांगे, संतोष दराडे यांनी हा कॅम्प यशस्वीरित्या पार पाडला.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी नगरसेवक अमर हंगरगेकर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगणे, शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राम चोपदार, नितीन पवार, प्रशांत राठोड, यांच्यासह भाजपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरगरीब लोकांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करणारे केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे महायुतीचे सरकार विविध योजना देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करीत आहे यामध्ये आम्हाला देखील काम करण्याची संधी मिळाली आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्याची विकासा मध्ये सुरू असलेली आघाडी समाजातील सर्व जाती धर्माला न्याय देणारी आहे जनतेमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण आहे अशी प्रतिक्रिया या निमित्ताने शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष राम चोपदार यांनी दिली आहे.