राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज आहेर यांचे तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री मा. श्री. हंसराजजी आहेर साहेब यांनी आज तुळजापूर येथे आगमन करून भक्तिभावाने श्री क्षेत्र तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.


या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे तुळजापूर विधानसभा संयोजक दिनेश बागल यांनी श्री. आहेर साहेबांचे स्वागत करत त्यांना तुळजाभवानी देवीची सुंदर प्रतिमा भेट दिली.


श्री. आहेर साहेबांनी दर्शनानंतर संवाद साधताना सांगितले की, “तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी ही अध्यात्मिक ऊर्जा व प्रेरणा देणारी आहे. समाजातील मागासवर्गीय घटकांसाठी न्याय व विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”


यावेळी स्थानिक भाजपा कार्यकर्ते, युवा मोर्चा सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top