तुळजापूर श्री कृतज्ञता पुरस्कार जाहीर : पत्रकारांचा मान सन्मानाने उंचावणार

mhcitynews
0

 


तुळजापूर प्रतिनिधी 

समाजाला दिशा देणाऱ्या आणि सत्यासमोर झुकणार नाही, असा पत्रकारितेचा ध्यास घेत झगडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी तुळजापूरमध्ये ‘श्री कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचा पहिलाच वर्ष असून, दैनिक सकाळचे प्रतिनिधी जगदीश कुलकर्णी, दैनिक पुढारीचे डॉ. सतीश महामुनी, व दैनिक लोकमतचे गोविंद खुरूद यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही माहिती पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी दिली.


हा पुरस्कार पुजारी नगर फाऊंडेशन व तुळजापूर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणार असून, ८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता, नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ लॉन्स येथे एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकालीन कार्य करून निवृत्त झालेले ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड. किशोर कुलकर्णी, महिपतराव कदम आणि अंबादास पोफळे यांचा ही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.


पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष सचिन ताकमोघे, तालुका अध्यक्ष प्रदीप अमृतराव, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम व ज्येष्ठ पत्रकार संजय खुरूद यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


सन्मानाचा उद्देश – एक प्रेरणा

समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींना ‘थँक यू’ म्हणणं हीच खरी कृतज्ञता. त्यांच्या कामाची दखल घेणं, हा आमचा सामाजिक संकल्प आहे. ‘तुळजापूर श्री कृतज्ञता पुरस्कार’ हे त्या सामाजिक भावनेचे रूप आहे.”

गणेश पुजारी, अध्यक्ष – पुजारी नगर फाऊंडेशन

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top