जय शिवाजी तरुण मंडळ महात्मा फुले युवा मंच तुळजापूर (खुर्द) गणेशोत्सव समिती 2025 ची नवी कार्यकारिणी जाहीर

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

जय शिवाजी तरुण मंडळ महात्मा फुले युवा मंच तुळजापूर (खुर्द) यांच्या गणेशोत्सव समिती 2025 साठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच पार पडली. 27 जुलै रोजी कै. मेहता गुरुजी सांस्कृतिक सभागृह येथे झालेल्या बैठकीत ही निवड मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. अजिंक्यभैय्या नन्नवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


या निवडीत कृष्णा तानाजी भोजने यांची अध्यक्षपदी, तर शुभम मोहन जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिवपदी मंगेश अण्णासाहेब कुंभार, सहसचिव माऊली शंकर भोजने, कोषाध्यक्ष सुबोध राजेंद्र माळी आणि सहकोषाध्यक्ष ओंकार नेताजी भोजने यांची निवड झाली.


मिरवणूक प्रमुख म्हणून विश्वास भोजने, अनिकेत भोजने, अजय गायकवाड, रोहित भोजने आणि गणेश लोले यांची निवड करण्यात आली.


गणेशोत्सव 2025 निमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये भजन, कीर्तन, सामाजिक प्रबोधनात्मक शिबिरे, आरोग्य शिबिर, विविध स्पर्धा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि अन्नदान महाप्रसाद अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.


या बैठकीस गणेश नन्नवरे, सोमनाथ भोजने, चैतन्य क्षीरसागर, अजय गायकवाड, रोहित भोजने, शिवम भोजने, ज्ञानेश्वर भोजने, गणेश खारे, पवन भोजने आदींची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top