तुळजापूर प्रतिनिधी
इटकळ (ता. तुळजापूर) येथील अनेक सामाजिक व युवा कार्यकर्त्यांनी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून गावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे.
धोंडिबा शिंदे, श्रीधर सावंत, प्रताप शिंदे, नितीन सावंत,दत्ता शिंदे, आप्पा बागल, सागर शिंदे, मारूती सावंत, वैजीनाथ बागल, विकास शिंदे, अमोल शिंदे यांच्यासह‘जाणता राजा’आणि‘चंद्रकिरण तरुण मंडळ’मधील अनेक कार्यकर्ते आता भाजपच्या विचारसरणीत सहभागी झाले आहेत.
या प्रवेशासाठी भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रतीक रोचकरी यांनी पुढाकार घेतला. यावेळी उपस्थित सर्वांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे जोरदार स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
"सकारात्मक विचार आणि जनसेवेचे कार्य अखंडपणे करत राहतील," असा विश्वास रोचकरी यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, सज्जनराव साळुंके, संतोष बोबडे, आनंद कंदले, आशिष सोनटक्के, मनोज माडजे, राहुल साठे, दिनेश बागल यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
