नगर संकीर्तन आनंदोत्सवात संपन्न

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या नगर संकीर्तनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . सकाळी 7:15 वा . श्री नाथ मंगल कार्यालय येथून नगर संकीर्तनास प्रारंभ होऊन पुजारी नगर, हनुमान नगर, मारुती मंदीर मार्गे श्री जयराम मोकाशे यांच्या घरी सांगता करण्यात आली . यावेळी प्रभुजींनी मनुष्य जीवनाची सार्थकता विषद केली . कलियुगात मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येकाने आपला अध्यात्मिक स्तर उंचावणे आवश्यक आहे . त्यासाठी नियमित जप भगवंत कथा श्रवण तसेच सतत हरिनाम घेत राहणे यांमुळेच मनुष्य जीवन सार्थक होते असे प्रभूजी म्हणाले . मनुष्य जीवनात अध्यात्मिक प्रगती नसेल तर हे जीवन व्यर्थ गेल्यासारखे आहे . पशु, पक्षी, प्राणी हे इच्छा असूनही हरिनाम घेऊ शकत नाहीत त्यासाठी मनुष्य देहच लागतो . आपल्याला दुर्मिळ असा मनुष्य देह मिळाला आहे म्हणूनच आतातरी याचे सार्थक करा असे प्रभूजी म्हणाले .

यावेळी आगामी 28 जुलै रोजी होत असलेल्या श्रीमद् भागवत कथेचे आमंत्रण देखील देण्यात आले . या कथा सोहळ्यात सर्वांनी सहभागी होऊन तन - मन - धनाने सहकार्य करावे, असे आवाहन प्रभूजींनी केले . यावेळी 50 ते 60 भाविक - भक्त उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top