युवा शिलेदार शुभम क्षीरसागर यांची भाजप तुळजापूर शहर सरचिटणीसपदी निवड

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहर मंडळाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीत शुभम श्रीराम क्षीरसागर यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असून युवकांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


शुभम क्षीरसागर हे अत्यंत सक्रिय, युवा कार्यकर्ते म्हणून परिचित असून अल्पावधीतच त्यांनी जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि संघटन कौशल्याच्या जोरावर पक्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता आणि नेतृत्वगुण लक्षात घेऊन पक्षाने ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.


या निवडीमुळे तुळजापूर शहर भाजपमध्ये नव्या दमाच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळाले असून, पक्षाची युवा फळी अधिक बळकट होईल, असा विश्वास तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी व्यक्त केला.


शुभम क्षीरसागर यांनी पक्षाच्या आदेशाला सर्वोच्च मान देत तुळजापूर शहरात भाजपाची ध्वजदंड उंचावण्यासाठी अहोरात्र कार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या निवडीमुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांना पक्षात पुढे येण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top