महिला पदाधिकाऱ्यांची निवड, कामगार हक्कासाठी पुढाकार
तुळजापूर प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या नव्या पर्वाची सुरुवात तुळजापूर येथून झाली आहे. 27 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता तुळजापूर येथे इंटकचे जिल्हा कार्यालय मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या वेळी झालेल्या बैठकीत संघटनेच्या महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या आदेशावरून हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंटकचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके होते.
या बैठकीत कामगार हक्क, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, व त्यांच्या न्यायासाठीच्या लढ्याचे महत्त्व यावर सखोल चर्चा झाली. इंटक बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी इंटकच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देताना सांगितले की, "संघटित असो वा असंघटित, प्रत्येक कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी इंटक कटिबद्ध आहे. सर्वांनी संघटनेत सक्रिय सहभाग घ्यावा."
यावेळी महिला कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. यात तुळजापूर तालुक्यातील महिला पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
तालुका अध्यक्षा: प्रियांका कदम
तालुका उपाध्यक्षा: ताई दयानंद राठोड
कोषाध्यक्ष: छाया जयवंत भोसले
सचिव: श्रद्धा राठी
या नियुक्त्यांचे नियुक्तीपत्र बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके आणि महिला आघाडी प्रमुख पूनम कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास इंटकचे जिल्हा सचिव किरण यादव, युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगळे, तसेच अनिल शिंदे, बापू माळी, विकास हावळे, रवींद्र लगाडे, निरंजन हटकर, मोनिका कदम, सुरेखा पवार, सुहास कानडे, पांडुरंग चव्हाण, हरी सुरवसे, सत्यजित चव्हाण, विकास घोडके, रोहित शेंडगे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा उद्देश फक्त कार्यालयाचे उद्घाटन नव्हे, तर जिल्ह्यातील कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे व महिला नेतृत्वाला सक्षम करणे हाच होता, हे यावेळी ठळकपणे अधोरेखित झाले.
