जिजामाता नगरमध्ये भव्य स्वागत कमानीचे उद्घाटन; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
तुळजापूर प्रतिनिधी
समाजहिताची जाणीव ठेवत जान्हवी बालाजी तट हिचा वाढदिवस अत्यंत विधायक पद्धतीने आणि अनावश्यक खर्च टाळून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त "जिजामाता नगर प्रवेशद्वार" या नावाने एक भव्य व आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली असून, हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.
या स्वागत कमानीचे उद्घाटन जिजामाता नगरमधील महिलांच्या सामूहिक हस्ते करण्यात आले. महिलांचा सक्रिय सहभाग, एकत्रित नेतृत्व आणि सामाजिक भान या उपक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित झाले.
या कार्यक्रमात विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, जान्हवीस उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, जनसेवक अमोल भैया कुतवळ, माजी नगरसेवक राहुल भैया खपले, सुधीर कदम, रंजीत भैया इंगळे, नरेश काका पेंदे, सुदर्शन वाघमारे, अमर चोपदार, अर्जुन साळुंके, किरण यादव, मधुकर शेळके, पिंटू कंदले, अनमोल साळुंके, भाऊ भांजी, तौफिक शेख यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
तसेच जिजाबाई दाणे, मथुरा क्षीरसागर, पारूबाई सावंत, रेखा कापसे, जया कापसे, रुबीना पलंगे, प्रियंका ढोरे, संगीता तट, पूजा केवडकर, सुरेखा व मंगल जाधव, सरुबाई व अश्विनी काळे, सुलोचना काटे, पवार मावशी, घोडके मावशी, रेखा घोडके, कालींदा यादव, रुक्मीनबाई बचाटे, सीताबाई व पारूबाई वीर, निकिता पालखी आदींसह जिजामाता नगरमधील अनेक महिला उपस्थित होत्या.
या विधायक उपक्रमामुळे जान्हवीचा वाढदिवस एक सामाजिक प्रेरणादायी क्षण ठरला असून, असे उपक्रम समाजात सकारात्मकता निर्माण करणारे आहेत.
