तुळजापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) धाराशिव व हरेकृष्ण भक्त, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल रुक्मिणी - मंदिर जिजामाता नगर येथे दिनांक 20 ऑगस्ट रोजी भव्य असा 'श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव' आयोजित केला आहे.
बुधवारी दुपारी 04:00 वाजलेपासून महोत्सवाची सुरुवात होत असून यामध्ये पूजा, अभिषेक, संकीर्तन, आरतीसह महाप्रसाद असणार आहे. प्रवचनकार श्रीमान प्रजापती विष्णुदास 'कृष्ण जन्म व कृष्ण लीला' यावर संबोधन करणार आहेत. यंदाचे हे दुसरे वर्ष असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
