राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उपक्रम - डॉ धर्मराज वीर यांचे प्रतिपादन
धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस.आर रंगनाथन यांचा ९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला गेला,या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात डॉ धर्मराज वीर,माजी संचालक, ज्ञान स्त्रोत केंद्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात होते,सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले, पुढे ते म्हणाले की,वर्तमानात विद्यार्थ्यांची किंबहुना समाजाची वाचनाची प्रवृत्ती कमी होत चालली आहे,कारण डिजिटल मीडियामुळे लोक ग्रंथांपासून दूर होत चालले आहेत, आपल्या संस्कृतीचा सभ्यतेचा विकास हा वाचन संस्कृतीमुळे झाला आहे, बालकांच्या बुध्दीचा विकास मोबाईलमुळे खुंटत चालला आहे,पूर्वी आपल्याकडे प्रौढ शिक्षण वर्ग चालायचे त्यामुळे निरक्षर लोक साक्षर होऊन वृत्तपत्र वाचू लागली,पण आता चित्र बदलले आहे, लोक साक्षर झाली हे जरी खरे असले तरी संवेदनशील राहीली नाहीत, पुस्तकांमुळे मानवी बुद्धीला चालना मिळते,तो ज्ञानी होतो, संवेदनशील होतो, मानसिकता सकारात्मकता येते,परंपरेचे संस्कृतीचे ज्ञान प्राप्त होते . मानवी मेंदू मोबाईल मुळे रोगग्रस्त होत आहे, कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा असणे गरजेचे आहे, ज्यावेळी फक्त वृत्तपत्रे होती आणि लहान मुले शाळेतून घरी यायची तेंव्हा आई वडील त्यावेळी त्या लहान मुलांना मराठीचे एखादे पुस्तक किंवा वृत्तपत्र हाती द्यायची आणि वाचन घ्यायची तेंव्हा बालकांना हळुहळू वाचनाची सवय लागायची,आता परत हिच सवय पालकांनी पाल्यांना लावणे गरजेचे आहे,ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार असतात,आणि सहजतेने उपलब्ध देखील होतात, माणूस बुद्धीवादी व्हायचा असेल तर तो ग्रंथाशिवाय होणार नाही असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला, यावेळी डॉ सुभाष चव्हाण, संचालक ज्ञानस्त्रोत केंद्र,एस एन डी टी महीला विद्यापीठ मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती,सदर प्रसंगी डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ .मदनसिंग गोलवाल यांनी व्यक्त केले,तर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांनी केला,सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले, यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
