श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव उत्साहात संपन्न !

mhcitynews
0

तुळजापूर  प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ - इस्कॉन धाराशिव व हरेकृष्ण भक्त तुळजापूर आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव उत्साहात पार पडला. जिजामाता नगरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेल्या या महोत्सवात पूजा, अभिषेक, प्रवचन, संकीर्तन, आरती होऊन महाप्रसाद झाला. प्रवचनकार श्रीमान प्रजापती विष्णुदास यांनी कलीयुगात भगवंतप्राप्तीसाठी श्रद्धेने सतत नामस्मरण, भगवंत कथा श्रवण व भगवंताचा प्रसाद घेतल्याने याच जन्मात भगवंतप्राप्ती शक्य आहे, असे सांगितले. स्वयंपाक झाल्यानंतर प्रत्येक पदार्थ भगवंतांना भोग (नैवेद्य) लावूनच आपण ग्रहण केला पाहिजे त्यामुळे तो पदार्थ न राहता प्रसाद बनतो यामुळे आपल्या हातून अभक्ष भक्षण होत नाही असे प्रभुजींनी सांगितले.


कलियुगात गायीचे व ब्राह्मणाचे कैवारी भगवंत आहेत. गाय व पवित्र ब्राह्मण जोपर्यंत सुरक्षित नाहीत तोपर्यंत कलियुगातील कलह वाढतच जाणार. समाज सुख- संपन्न होण्यासाठी गोहत्या थांबली पाहिजे, असे प्रभुजी म्हणाले. यावेळी 250 ते 300 भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top