तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर कासार गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल सेवा भावी मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 16 रोजी म्हणजेच गोकुळाष्टमीच्या दिवशी श्री. ह.भ.प.हनुमंत महाराज काळे यांच्या कालाच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.त्यानंतर काल्याचा महाप्रसाद आयोजक नगरसेवक सुनील रोचकरी व श्री ह भ प खंडू महाराज भास्कर (गवळी) यांनी काळे महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळेस ह भ प नाना देशमुख मुन्ना कदम भैय्या,अण्णा अमृतराव नितीन मस्के,अमोल आकुडे,संजय देवळालकर, याप्रसंगी उपस्थिती होते. सात दिवस चाललेल्या सप्ताह सोहळ्यात काकड आरती पारायण गाथा भजन हरिपाठ हरि किर्तन इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.
