श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मुद्गलेश्वरांची महापूजा संपन्न

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून श्री मुद्गलेश्वर मंदिरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. ही दिव्य सजावट व महापूजा शहरातील उद्योजक अनिल शेठ अग्रवाल यांच्या वतीने भक्तिभावाने संपन्न झाली.


दरवर्षी अग्रवाल यांच्या वतीने मंदिरात नव्या-नव्या प्रकारची सुंदर फुलांची सजावट करण्यात येते. भाविकांसाठी ही सजावट म्हणजेच सेवा अर्पण असून, मंदिर परिसर भक्तिमय आणि आकर्षक वातावरणाने उजळून निघतो.


या महापूजेला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून मुद्गलेश्वरांचे दर्शन घेतले आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिव्य आनंद अनुभवला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top