धाराशिव जिल्हा न्यायालयीन सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सभा उत्साहात पार

mhcitynews
0

तुळजापूर | सिद्दीक पटेल

धाराशिव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री. आनंद सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.


31 मार्च 2025 अखेर संस्थेला 78 लाख 33 हजार रुपयांचा नफा झाला असून यावर्षी सभासदांना 6.5 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.


सभेत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यानुसार, सभासदांची नियमित कर्ज मर्यादा पाच लाखांवरून सहा लाखांपर्यंत, तर तातडी कर्ज मर्यादा 25 हजारांवरून 30 हजारांपर्यंत वाढविण्यात आली. सर्व ठराव एकमताने मंजूर झाले.


वार्षिक सभेला मोठ्या संख्येने सभासद व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन श्री. अमोल पवार (संचालक व अध्यक्ष – जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना, वर्ग ३, धाराशिव-उस्मानाबाद) यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री. यशवंत गोमादे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top