तुळजापूर / सिद्दीक पटेल
महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे शहर देशभरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण शक्तिपीठ मानले जाते. महाराष्ट्र क्षात्रतेजाची प्रेरणादायी देवता आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता अशी ही भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
याच पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ भव्यदिव्य उत्साहात साजरा होत आहे. २२ ते ३० सप्टेंबर या नऊ दिवसांत भक्तिभाव आणि सांस्कृतिक सोहळ्यांनी तुळजापूर नगरी मंगलमय होणार आहे.
मान्यवर कलाकारांचा सहभाग
या महोत्सवात राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील अनेक ख्यातनाम कलाकार सहभागी होणार आहेत.
२२ सप्टेंबर – रोहित राऊत (इंडियन आयडॉल फेम) – भक्तिसंगीत व ऑर्केस्ट्रा
२३ सप्टेंबर – पं. जयतीर्थ मेवुंडी – शास्त्रीय संगीतमय संध्या
२४ सप्टेंबर – अभिजीत जाधव – लोकसंगीत मैफल
२५ सप्टेंबर – फोक लोक स्टुडिओ – लोकसंगीत मैफल
२६ सप्टेंबर – शाहीर रामानंद उगले – पोवाडे व लोकसंगीत
२७ सप्टेंबर – रसिकर्पण डान्स अकॅडमी – लोकनृत्य सादरीकरण
२८ सप्टेंबर – राणा जोगदंड – लोकसंगीत मैफल
२९ सप्टेंबर – भव्य ड्रोन शो – ३०० ड्रोनद्वारे नवरात्र थीम लाईट शो
३० सप्टेंबर – फोक आख्यान – लोकसांगीतिक भव्य समारोप
🌟 महोत्सवाची वैशिष्ट्ये
- प्रेरणादायी सांस्कृतिक व लोककला कार्यक्रम
- सुप्रसिद्ध कलाकार व मान्यवरांचा सहभाग
- पारंपरिक भक्ती, संगीत व नृत्य आधुनिकतेच्या स्पर्शासह
- विशेष आकर्षण – ३०० ड्रोनद्वारे नवरात्र थीम लाईट शो
🌼 महिलांचा सन्मान
या महोत्सवात जिल्ह्याचा लौकिक वाढवणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना व्यासपीठ मिळणार आहे.
🙏 भाविकांना आवाहन
आयोजक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की,
या दैवी नवरात्र सोहळ्यात सहभागी होऊन श्री भवानी मातोश्रींच्या कृपेचा लाभ घ्यावा. भक्तिभाव, संगीत व संस्कृतीच्या या संगमात आपली उपस्थिती महोत्सवाची शोभा वाढवेल
