तुळजापूर (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा धाराशिव दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रतिक राजकुमार रोचकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
या नियुक्तीनंतर पक्ष संघटन अधिक बळकट होईल आणि युवा पिढीला एक नवे नेतृत्व मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नियुक्तीपत्रात "ही जबाबदारी आपण यशस्वीरीत्या पार पाडाल व पक्ष संघटन वाढीसाठी परिश्रम कराल," असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
प्रतिक रोचकरी यांच्या नियुक्तीबद्दल पक्ष कार्यकर्त्यांकडून हार्दिक अभिनंदन होत असून, आगामी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

