सय्यद कलीम मुसा यांच्या पत्नी वाहिदा कलीम सय्यद जिल्हा परिषद आंबेजळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज!

mhcitynews
0


“सर्वसामान्य घरातून उमटलेलं महिला नेतृत्व” म्हणजेच मतदारांच्या चर्चेत असलेल्या वहिदा सय्यद 


महिला नेतृत्वाला मिळणार का प्रतिसाद ?


सिटी न्यूज / सिद्दीक पटेल


धाराशिव : अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात आरक्षण सोडतीनंतर नव्या चर्चांना उधान आले असून, सौ. वहिदा कलीम सय्यद या नावाने मतदार संघात नवा उत्साह निर्माण झाला आहे.


त्यांचे नाव पुढे आल्यानंतर परिसरात एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. अनेकांनी “आपल्यासारखीच सर्वसामान्य स्त्री नेतृत्वाच्या भूमिकेत येतेय” असा अभिमान व्यक्त केला आहे. “आमची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आम्ही पण सर्वसामान्यच आहोत. महिलांचे दुःख, महिलांच्या वेदना, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी सकारात्मक करता यावं, हीच इच्छा आहे,” असे सौ. वहिदा कलीम सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


त्या पुढे म्हणाल्या की “आंबेजवळगा मतदारसंघात मतदार राजा जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. कोणत्याही पक्षाने तिकीट दिले तर पक्षाच्या झेंड्याखाली लढण्याची तयारी आहे; अन्यथा ‘चल अकेला चल अपक्ष’ म्हणूनही मैदानात उतरणार आहोत. आम्ही विश्वास आणि लोकशाही या दोन आधारांवर ही निवडणूक लढवणार आहोत.”


अंबेजवळग्यात स्थानिक राजकारण नव्या वळणावर येत असून, महिला नेतृत्वाला मिळणारा प्रतिसाद या निवडणुकीचा नवा अध्याय ठरणार आहे. सर्वसामान्य घरातून आलेली ही उमेदवार आता मतदारांच्या मनात आशेचं प्रतीक ठरत आहे.

“राजकारण नव्हे, सेवाभाव हीच प्रेरणा — मतदारांच्या आशा वहिदा सय्यद यांच्याशी जोडल्या जात आहेत.”

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top